BMC Results 2026 – वॉर्ड क्रमांक 39 मधून शिवसेनेच्या पुष्पा कळंबे यांचा दणदणीत विजय, मिंधे गटाच्या उमेदवाराचा पराभव

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अतिशय चुरशीच्या ठरलेल्या वॉर्ड क्रमांक 39 मध्ये शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुष्पा कळंबे यांचा दणदणीत विजय झाला आहे. मिंधे गटाच्या विद्यमान नगरसेविका विनया सावंत यांना पुष्पा कळंबे यांनी पराभवाची धुळ चारली आहे.

वॉर्ड क्रमांक 39 मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार पुष्पा कळंबे यांच्यासह एकूण 8 उमेदवार रिंगणार उभे होते. मिंधे गटाच्या विनया सावंत, अजित पवार गटाच्या सुमन इंद्रजीत सिंह, काँग्रेसच्या मधु सिंह, बहुजन समाज पार्टीच्या रीता कांबळे, समाजवादी पार्टीच्या विश्वकर्मा सुनयना कुलदीप लाल, RPI च्या अनुसया हरिदास नवगिरे आणि प्रियांका गंगावणे या अपक्ष उमेदवार निवडणूकीच्या रिंगणार होत्या. या सर्वांचा पराभव करत पुष्पा कळंबे यांनी बाजी मारली आहे.