
पालिकेकडून पाणीपुरवठा होणाऱ्या रहिवाशांनी थकीत पाणीपट्टी 31 मार्चआधी भरावी, अन्यथा जलजोडणी कापली जाईल, असा इशारा पालिकेने थकबाकीदारांना दिला आहे.
महापालिका जल अभियंता खात्याने थकीत जल देयकांच्या वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांना जल देयकांचा भरणा करणे सुलभ व्हावे, या दृष्टिकोनातून नागरी सुविधा पेंद्रावर सुविधा करून देण्यात आली आहे. तसेच, महापालिकेच्या https://aquaptax.mcgm.gov.in या संकेतस्थळावरही जल देयक भरणा करता येणार आहे. या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांकरिता – लॉगइन – पाणी विभाग या मार्गाने जलदेयकाची माहिती पाहून भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय एनईएफटी, ऑनलाइन पेमेंट, मोबाईल अॅप अशा डिजिटल माध्यमांतून पाणीपट्टी भरता येणार आहे. ज्या जलजोडणीधारकांना जलदेयके प्राप्त झाली नसतील त्यांनी प्रशासकीय विभाग कार्यालयात संपर्क साधावा. नागरिकांना महापालिकेच्या अॅक्वा संकेतस्थळावरून किंवा संबंधित सहाय्यक अभियंता कार्यालयातून जलदेयकाची प्रत उपलब्ध करून घेता येईल, अशी माहितीही महापालिका प्रशासनाने दिली आहे.



























































