
गोंदिया तालुक्यातील कावराबांध येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या दहावीच्या परीक्षा पेंद्रावर दुसऱयाच्या नावावर विज्ञान-2 विषयाचा पेपर देताना तीन बोगस विद्यार्थी पकडले गेले. तिन्ही बोगस विद्यार्थी हे मध्य प्रदेशातील लांजी तालुक्यातील कारंजा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र संचालक ए. एस. कोरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैभव मटाले, समीर मटाले आणि मयंक ठमकलाल बनोठे अशी या बोगस परीक्षार्थ्यांची नावे आहेत.
























































