अभिनेता अजय देवगनचा 2012 मध्ये रिलीज झालेला एक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. अजय देवगनच्या ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटला चाहत्यांनी पसंती दिली होती. आता 12 वर्षानंतर अजय देवगनच्या ‘सन ऑफ सरदार 2’ चे शुटिंग लंडनमध्ये सुरू झाले आहे. विजय कुमार अरोरा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. आणि चित्रपटाची या नंतरची शुटिंग भारतात होणार आहे. अजय देवगनने शेअर केलेल्या पोस्टला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अजय देवगनने ‘सन ऑफ सरदार 2’ च्या शुटिंग दरम्यान त्याच्या हटके अंदाजातील एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावर त्याच्या एका चाहत्याने ‘पाजी कभी हस भी लिया करो’ अशी कमेंट करून शुभेच्छा दिल्या.
‘सन ऑफ सरदार 2’ मध्येही दिसणार संजय दत्त
‘सन ऑफ सरदार 2’ मध्ये संजय दत्त दिसणार नाही. त्यांच्याजागी रवी किशन या चित्रपटात काम करणार, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी होती. पण प्रोडक्शन हाउसने ही चर्चा फेटाळली आहे. संजय दत्त या चित्रपटाचा भाग असल्याची माहिती दिली आहे. रवी किशनची या चित्रपटात नविन प्रवेश असल्याचे योजले आहे.
अजय देवगणचा 2012 मध्ये आलेला ‘सन ऑफ सरदार’ हा चित्रपट अश्विनी धीर यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट 2010 मध्ये आलेल्या तेलुगू हीट चित्रपट ‘मर्यादा रमन्ना’ रिमेक होता. ‘मर्यादा रमन्ना’ या चित्रपटाचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले होते. सन ऑफ सरदारमध्ये अजय देवगणसोबत संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि जुही चावला मुख्य भूमिकेत होते. 30 कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने जगभरातून 160 कोटी रुपयांची कमाई केली होती.