हमारे बाराह चित्रपटावरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठवली, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Hamare-Baarah

अन्नू कपूर यांच्या ‘हमारे बारह’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटावरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठवली आहे. या चित्रपटातील तीन वादग्रस्त वक्तव्य काढून टाकल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आता हा चित्रपट 21 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

हमारे बाराह हा चित्रपट एका विशेष समुदायाविरोधात असल्याचे सांगत या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने त्यावर बंदी घातली होती. त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन दोन वेळा पुढे ढकलण्यात आले.

दरम्यान या प्रकरणात निर्मात्यांनी या चित्रपटातील तीन वादग्रस्त डायलॉग हटविण्याची तयारी दर्शविल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्या प्रदर्शनाला परवानगी दिली आहे.