भरपाई नाकारणाऱ्या रेल्वेला चपराक, कुटुंबीयांना तीन लाख देण्याचे हायकोर्टाने दिले आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वतःच्याच कर्मचाऱयाच्या रेल्वे अपघाताची नुकसानभरपाई नाकारणाऱया मध्य रेल्वेला उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली. या कर्मचाऱयाच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने रेल्वेला दिले.

या कर्मचाऱयाचा एक्स्प्रेसमधून पडून मृत्यू झाला होता. या कर्मचाऱयाकडे एक्स्प्रेस प्रवासाचे वैध तिकीट नव्हते, असा निष्कर्ष काढत रेल्वे अपघात दावा न्यायाधिकरणाने कुटुंबीयांना नुकसानभरपाई नाकारली. त्याविरोधात कुटुंबीयांनी अपील दाखल केले. न्या. जितेंद्र जैन यांच्या एकल पीठासमोर यावर सुनावणी झाली. न्या. जैन यांनी न्यायाधिकरणाचा निकाल रद्द करत कर्मचाऱयाच्या कुटुंबीयांना दिलासा दिला.