
आज देशाचा अर्थसंकल्प असून अर्थमंत्री निर्मला सितारमन अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पासोबतच निर्मला सितारमन चर्चेत असतात ते त्यांच्या आकर्षक साड्यांमुळे. त्यांनी अर्थसंकल्पासाठी नेसलेल्या साड्या या कायम चर्चेत असतात. त्या दरवेळी त्यांच्या साडीतून त्या कोणत्या ना कोणत्या राज्याची हॅण्डलूम साडी नेसून सांस्कृतिक ओळख पटवून देतात. त्या साड्या हॅंडलूम असतात त्यामुळे अनेकांचे यावेळी सितारमन कोणती साडी नेसणार याकडे लक्ष लागून होते. निर्मला सितारामन यांची जांभळ्या रंगाची साडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
निर्मला सितारमन यावेळी नव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तो सादर करण्यााठी यावेळी त्यांनी तामिळनाडूची पारंपारीक कांजीवरम सिल्क साडी नेसली आहे. ही जांभळ्या रंगाची कट्टम कांजीवरम साडी असून त्यावर हलके गोल्डन रंगाचे चेक्स डिझाईन आहेत. ज्याला तामिळमध्ये कट्टम बोलले जाते. तर साडीची बॉर्डर कॉफी ब्राऊन रंगाची आहे. ज्यावर सुंदर थ्रेड वर्क केले आहे. विशेष म्हणजे यावर्षी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुक होणार आहे. त्यामुळे ही साडी राजकीय दृष्ट्या देखिल महत्वाची मानली जात आहे.
निर्मला सितारमन यांच्या अर्थसंकल्प सादर करण्यासाठी नेसली जाणारी साडी केवळ फॅशन नसते तर ती देशाचे कारागीर, विणकर आणि पारंपारिक कलांना देशासमोर आणण्याचे माध्यम आहे. दरवर्षी त्या वेगवेगळ्या राज्यांच्या साड्या नेसून राज्यांच्या विणकर आणि इंडियन हॅण्डलूमला प्रमोट करतात. याचमुळे त्यांच्या साडीवर राजकीय विश्लेषकांच्याही नजरा असतात.
2025 च्या अर्थसंकल्पात सितारमन यांनी ऑफ व्हाईट रंगाची साडी नेसली होती. त्यानर मधुबनी पेण्टिंग होती. या साडीवर मासे आणि कमळासारखे पारंपारिक डिझाईन होते. ही साडी त्यांनी पद्मश्री पुरस्कार सन्मानित दुलारी देवी यांनी भेट दिली होती. ही साडी बनवण्यासाठी एक महिन्याहून अधिक दिवस लागला होता. ही साडी बिहारची लोककला आणि महिला कलाकारांना समर्पित होती.
























































