
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदे अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात करश्रेणीत बदल करण्यात येतील. जुनी करश्रेणी आणि नवीन करश्रेणीतील संभ्रम दूर करण्यात येईल. तसेच सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, सर्वसामान्यांच्या या अपेक्षएवर सीतारमण यांनी पाणी फेरले आहे. त्यांनी करश्रेणीत कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांवरील कराचा बोजा तसाच राहणार आहे.
बऱ्याच लोकांना वाटले की, या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सबद्दल मोठी घोषणा केली जाईल. मात्र, तशी काहीच झाले नाही. इन्कम टॅक्स आहे तसाच राहणार आहे. नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत – आयटीआर-1 आणि आयटीआर-2 दाखल करणारे 31 जुलैपर्यंत दाखल करू शकतील. ऑडिट नसलेल्या व्यवसाय प्रकरणे आणि ट्रस्टसाठी रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट असेल.
मालमत्ता विकणाऱ्या एनआरआयसाठी टीडीएस नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. पूर्वी आवश्यक असलेला टीएएन आता आवश्यक राहणार नाही.अपघाती विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स लागणार नाही. शिक्षण आणि आरोग्यासाठीचा टीसीएस दर कमी करण्यात आला आहे. तो 5% वरून 2% पर्यंत कमी करण्यात येईल. कर्ज नसलेल्या प्राप्ती 36.5 लाख कोटी असेल. निव्वळ कर प्राप्ती 28.7 लाख कोटी असेल. सुधारित रिटर्नसाठी अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. नाममात्र शुल्क भरून सुधारित रिटर्न दाखल करण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली की आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये राजकोषीय तूट (Fiscal Deficit) जीडीपीच्या 4.3% राहण्याचा अंदाज आहे. नवीन आयाकर अंमलबाजावणी 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार, अपघात विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स नाही.
सीतारमण यांनी शेअर बाजारातील व्यवहार कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. फ्यूचर आणि ऑप्शनमधील STT करात वाढ करण्यात आली आहे. फ्युचर्स ट्रेडिंगवरील STT वाढवून 0.05 करण्यात आला आहे, ऑप्शन्स आणि ऑप्शन प्रीमियमवरील STT अनुक्रमे 0.15% आणि 0.125% करण्यात आला आहे. या घोषणेनंतर शेअर बाजाराने नकारात्मक प्रतिक्रिया दिली असून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.























































