
देशाचे लक्ष लागून राहिलेला केंद्र सरकारचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज, 1 फेब्रुवारी रोजी संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पीय भाषण करतील. या अर्थसंकल्पाविषयी उद्योग जगतासह सर्वसामान्यांमध्येही उत्सुकता आहे.
- सर्वसामान्य करदात्यांना दिलासा नाही; आयकरात कोणताही बदल नाही
- पादत्राणे, बॅटरी, मायक्रो ओव्हन स्वस्त होणार, सौर उर्जेसंबधीची उपकरणे स्वस्त होणार
- चामडे आणि कपडे उद्योगावरील निर्यात शुल्कात कपात
- कॅन्सरच्या 17 औषधांवरील आयात शुल्कात कपात
- बायोगॅस ब्रेंडेड सीएनजीवर कोणताही कर नाही
- फ्युचर्स ट्रेडिंगवरील STT वाढवून 0.05 करण्यात आला आहे, ऑप्शन्स आणि ऑप्शन प्रीमियमवरील STT अनुक्रमे 0.15% आणि 0.125% करण्यात आला आहे.
- शेअर बाजारातील ऑप्शन ट्रेडिंगवर कर वाढवला
- क्लाउड सर्व्हिसेस देणाऱ्या परदेशी कंपन्यांना 2047 पर्यंत करमुक्ती
- तांत्रिक चुकांसाठी आता कठोर शिक्षेऐवजी फक्त दंड आकारला जाईल. तांत्रिक त्रुटींना गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर काढून ‘दंडनीय’ करण्यात आले आहे.
- छोट्या करविषयक गुन्ह्यांसाठी आता केवळ दंड भरावा लागेल, इतर कोणतीही मोठी कारवाई होणार नाही
- अघोषित संपत्तीची मर्यादा 1 कोटींपर्यंत वाढवली
- नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार, अपघात विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही कर नाही, आयकर परतावा भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत
- करांद्वारे 28 लाख कोटींचा महसूल मिळणार
- चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 4.4 टक्के, पुढल्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या 4.3 टक्के राहण्याचा अंदाज
- दिव्यांगजनांना अधिक सक्षम करण्यासाठी ‘दिव्यांग सहारा योजने’ची घोषणा
- 1 कोटी शेतकरी नारळाच्या शेतीवर अवलंबून, नारळ संशोधन केंद्राची स्थापना करून उत्पादन वाढवणार
- 500 एकात्मिक मत्स्य केंद्र उभारणार, मत्स्यव्यवसात महिलांचा सहभाग वाढवणार
- हिंदुस्थानच्या काजू, कोकोला जागतिक ब्रँड बनवणार, काजूसाठी प्रोसेसींग युनीट उभारणार
- दशकभरासाठी ‘खेलो इंडिया मिशन’ची घोषणा, क्रीडा प्रशिक्षण केंद्रे, प्रशिक्षण, स्पर्धा भरवणार
- पहिली ‘जागतिक व्याघ्र परिषद’ हिदुस्थानात होणार
- 95 देशांची कॅट परिषद हिंदुस्थानात भरणार, सरकारचे प्रमुख आणि मंत्री परिषदेत भाग घेणार
- नवीन सांस्कृतिक केंद्राची उभारणी करणार
- ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी’ स्थापन करणार
- देशातील 20 महत्त्वाच्या पर्यटन केंद्रावर 10 हजार गाईड्स निर्माण करणार
- मुंबईत एबीजीसीची कंटेंट क्रिएटर लॅब उभारणार
- प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृह उभारणार, 15 हजार शाळांमध्ये कंटेट क्रियेटर केंद्र
- जामनगरचे जागतिक आरोग्य संघटनेचे केंद्र आधुनिक करणार
- देशभरात तीन नवीन एम्स उभारणार
- पशुवैद्यक कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी अर्थसहाय्य करणार
- कोविडनंतर योग आणि आयुर्वेदाला जगभरात मान्यता मिळाली, आयुर्वेद अभ्यासासाठी 3 नव्या संस्था स्थापन करणार
- हिंदुस्थानला मेडिकल टुरिझम केंद्र बनवणार, देशभरात 5 ठिकाणी मेडिकल हब स्थापन करणार
- परदेशातील हिंदुस्थानींसाठी शेअर बाजारातील गुंतवणूक मर्यादेत वाढ
- 10 वर्षात 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले
- कंटेनर निर्मितीसाठी 10 कोटींची तरतूद
- टायर-2, टायर-3 शहरांच्या विकासासाठी 5 हजार कोटींची तरतूद
- 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बनवणार; मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडॉर बनवणार
- वाराणसी आणि पाटणा येथे जहाज बांधणी केंद्र उभारणार
- कोस्टल शिपिंग 6 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट
- 20 नवीन जलमार्गाची घोषणा, 2047 पर्यंत जलमार्गाचे जाळे 12 टक्क्यांपर्यंत वाढवणार, ओडिशात 22 नवे जलमार्ग निर्माण करणार, पुढच्या 5 वर्षात 20 राष्ट्रीय जलमार्ग सुरू करणार
- 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरातील पायाभूत सुविधा वाढवणार, 12.2 लाख कोटी रुपये शहर विकासासाठी वापरणार
- ‘आत्मनिर्भर भारत’साठी 2 हजार कोटींची तरतूद
- सुक्ष्म आणि लघू उद्योगांसाठी 10 हजार कोटींची तरतूद
- हातमागासाठी ‘महात्मा गांधी ग्रामस्वराज अभियान’ राबवणार
- वस्त्रोद्योग, हातमाग आणि हस्तकला उद्योगांना चालना देणार, मेगा टेक्सटाईलची उभारणी करणार
- आयात कमी करणे आणि निर्यात वाढवणे हे आमचे लक्ष्य
- बायोफार्मा शक्तीसाठी 10 हजार कोटींची तरतूद, तीन मोठ्या केमिकल पार्कची स्थापना करणार
- केरळ, आंध्र प्रदेश आणि ओडिसामध्ये दुर्मीळ खनिज उत्खनन केंद्रे
- सेमी कंडक्टर क्षेत्रावर जास्त भर देत असून सेमी कंडक्टर क्षेत्रासाठी 40 हजार कोटींची तरतूद
- कर्करोग आणि मधुमेहावरील औषधे स्वस्त करणार
- हिंदुस्थानला औषध निर्मितीचे केंद्र बनवत आहोत
- विकास दर वाढावा म्हणून आम्ही सहा क्षेत्रांवर भर देत आहोत
- आर्थिक विकास दरात वाढ हे आमचे पहिले कर्तव्य आहे
- आत्मनिर्भर भारत हे सरकारचे लक्ष्य आहे
- कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढवण्यावर भर
- लोकांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य
- आमची सुधारणांची एक्सप्रेस वेगाने धावत आहे
- आम्ही देशातील गरिबी निर्मुलनासाठी महत्त्वाचे काम केले
- 350 हून अधिक सुधारणा आम्ही केल्या
- 12 वर्षांपासून नियोजनबद्ध विकास सुरू
- संत रविदास यांचे नाव घेऊन सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात
- हे ‘रिफॉर्म’ नाही, तर ‘डिफॉर्म बजेट आहे. हा अर्थसंकल्प देशातील केवळ 5 टक्के लोकांसाठी आहे. भाजप फक्त आपल्या माणसांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे, असे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव म्हणाले.
- अर्थसंकल्पाकडून जास्त अपेक्षा नाहीत, असे काँग्रेस खासदार प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव म्हणाले.
#WATCH | On #UnionBudget2026, Congress MP Priyanka Gandhi Vadra says, “I don’t have much expectations, but let’s see.” pic.twitter.com/S6bweRs3Ss
— ANI (@ANI) February 1, 2026
- गरीबांसाठी घोषणा आणि उद्योगपतींचे हित असा अर्थसंकल्प असू नये, संजय राऊत यांची प्रतिक्रिया
गरीबांसाठी घोषणा आणि उद्योगपतींचे हित असा अर्थसंकल्प असू नये, संजय राऊत यांची प्रतिक्रिया@rautsanjay61 #UnionBudget2026 pic.twitter.com/l9LNTon65R
— Saamana Online (@SaamanaOnline) February 1, 2026
- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अर्थसंकल्पास मंजुरी
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत पोहोचल्या, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक सुरू
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि अर्थमंत्रालयाचे प्रमुख अधिकारी संसदेत दाखल
#WATCH | #UnionBudget2026 | Union Finance Minister Nirmala Sitharaman and MoS Finance Pankaj Chaudhary, along with their team, arrive at the Parliament. pic.twitter.com/UBv1ZhfaoE
— ANI (@ANI) February 1, 2026
- पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत पोहोचले, थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची बैठक
- अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजाराची सावध प्रतिक्रिया, घसरणीनंतर बाजारात किरकोळ तेजी
- अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी शुभ संकेत म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दही-साखर दिले.
निर्मला सीतारामन नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, राष्ट्रपतींनी दही-साखर भरवून तोंड केलं गोड #NirmalaSitharaman #Budget2026 pic.twitter.com/Fbcv46aVxn
— Saamana Online (@SaamanaOnline) February 1, 2026
- अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट
#WATCH | Delhi | Union Finance Minister Nirmala Sitharaman, along with her team, calls on President Droupadi Murmu before presenting her ninth consecutive Union Budget pic.twitter.com/96H5JV5obv
— ANI (@ANI) February 1, 2026
अर्थ मंत्रालयातून अर्थसंकल्प घेऊन निर्मला सीतारमण राष्ट्रपती भवनाकडे रवाना, 11 वाजता सादर करणार अर्थसंकल्प #Budget2026 #Budget pic.twitter.com/tXbJ3vqnTZ
— Saamana Online (@SaamanaOnline) February 1, 2026
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज नवव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प























































