
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मोदी 3.0 सरकारच्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प होता. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी नवव्यांदा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या. प्रमुख घोषणांबाबत जाणून घेऊया…
- आत्मनिर्भर भारत हे सरकारचे लक्ष्य आहे. ‘आत्मनिर्भर भारत’साठी 2 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- हिंदुस्थानला औषध निर्मितीचे केंद्र बनवत असून कर्करोग आणि मधुमेहावरील औषधे स्वस्त करण्यात येईल. कॅन्सरच्या 17 औषधांना आणि 7 दुर्मीळ आजारांवरील औषधांना आयात शूल्कामध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.
- देशात 20 नवीन जलमार्गाची घोषणा करण्यात आली असून 2047 पर्यंत जलमार्गाचे जाळे 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येईल. पुढील 5 वर्षात 20 राष्ट्रीय जलमार्ग सुरू करणार असून ओडिशात 22 नवे जलमार्ग निर्माण करण्याची घोषणा सीतारामन यांनी केली. तसेच वाराणसी आणि पाटणा येथे जहाज बांधणी केंद्र उभारण्यात येणार असून कोस्टल शिपिंग 6 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.
- देशात 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बनवणार आहेत. मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते चेन्नई,
हैदराबाद ते बेंगळुरू, चेन्नई ते बेंगळुरू, दिल्ली ते वाराणस आणि वाराणसी ते सिलिगुडी असे हे सात कॉरिडॉर असणार आहेत. - टायर-2, टायर-3 शहरांच्या विकासासाठी 5 हजार कोटींची तरतूद केली असून 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरातील पायाभूत सुविधा वाढवणार आहेत. 12.2 लाख कोटी रुपये शहर विकासासाठी वापरणार आहेत.
- कोविडनंतर योग आणि आयुर्वेदाला जगभरात मान्यता मिळाली, आयुर्वेद अभ्यासासाठी 3 नव्या संस्था स्थापन करणार
- हिंदुस्थानला मेडिकल टुरिझम केंद्र बनवणार. देशभरात 5 ठिकाणी मेडिकल हब स्थापन करणार.
जामनगरचे जागतिक आरोग्य संघटनेचे केंद्र आधुनिक करणार. पशुवैद्यक कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी अर्थसहाय्य करणार. बायोफार्मा शक्तीसाठी 10 हजार कोटींची तरतूद, तीन मोठ्या केमिकल पार्कची स्थापना करणार. - वस्त्रोद्योग, हातमाग आणि हस्तकला उद्योगांना चालना देणार, मेगा टेक्सटाईलची उभारणी करणार. हातमागासाठी ‘महात्मा गांधी ग्रामस्वराज अभियान’ राबवणार.
- प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृह उभारणार, 15 हजार शाळांमध्ये कंटेट क्रियेटर हब बनवणार अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली.
- दिव्यांगजनांना अधिक सक्षम करण्यासाठी ‘दिव्यांग सहारा योजने’ची घोषणा. 500 एकात्मिक मत्स्य केंद्र उभारणार, मत्स्यव्यवसात महिलांचा सहभाग वाढवणार. हिंदुस्थानच्या काजू, कोकोला जागतिक ब्रँड बनवणार, काजूसाठी प्रोसेसींग युनीट उभारणार. दशकभरासाठी ‘खेलो इंडिया मिशन’ची घोषणा, क्रीडा प्रशिक्षण केंद्रे, प्रशिक्षण, स्पर्धा भरवणार.
- शेअर बाजाराला धक्का, STT मध्ये वाढ. फ्युचर्स ट्रेडिंगवरील STT वाढवून 0.05 करण्यात आला आहे, ऑप्शन्स आणि ऑप्शन प्रीमियमवरील STT अनुक्रमे 0.15% आणि 0.125% करण्यात आला आहे.
- नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार. अपघात विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स नाही. आयकर परतावा भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत























































