
महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. नागा अश्विन लिखित आणि दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ या आगामी सायन्स फिक्शन चित्रपटात 6000 किलो वजनाची बुज्जी कार दिसणार आहे. आनंद महिंद्रा यांनी ही अनोखी कार चालवून तिच्या राईडचा अनुभव घेतला. बुज्जी कार केशरी रंगाची असून या कारमध्ये 47 किलोवॅट क्षमतेची पॉवरफुल बॅटरी आहे. याशिवाय ही कार 94 kW आणि 9800 Nm टॉर्क एवढी पॉवर जनरेट करते. बुज्जी कारमध्ये तीन टायर आहेत. समोरच्या टायरची लांबी 6075 मिमी आणि रुंदी 3380 मिमी आणि उंची 2186 मिमी इतकी प्रचंड आहे. या कारमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही वापर केला आहे. ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात अभिनेता प्रभास याने वापरलेली बुज्जी कार महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या कोयम्बतूरच्या जयम मोटर्सच्या यांच्या सहकार्याने विकसित केली आहे.