बुलढाण्यातील भाजप, काँग्रेस, शिंदे गटाचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत, उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात केले स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार तालुक्यांत शिंदे गट, काँग्रेस आणि भाजपला खिंडार पडले आहे. तिन्ही तालुक्यांतील या पक्षांच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून या सर्वांचे पक्षात स्वागत केले.

शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, बुलढाणा जिल्हा संपर्प प्रमुख नरेंद्र खेडेकर, मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा उपाध्यक्ष आशीष रहाटे, लोणार तालुका प्रमुख राजू बुधवत, युवा तालुकाध्यक्ष जीवन घायाळ यांच्यासह इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते

सरपंच ते जिल्हाध्यक्ष

काँग्रेस ओबीसी समितीचे जिल्हाध्यक्ष गजानन खरात, देऊळगाव वायसाचे सरपंच सोपान सोनुने, धाड गावचे सरपंच विलास मोरे, सोनुनाचे सरपंच साहेबराव वाठोरे, उमरा देशमुखचे सरपंच केशव वानखेडे, वरूडचे सरपंच तेजराव अवसरमोल, अर्जुन ढगे, विठ्ठल टाकरस, प्रताप सांगळे, उत्तम राठोड, गणेश मुंढे, रवी ओव्हर, शेख असलम शेख कासम, विठ्ठल राठोड, गुलाब वाकळे, गोपीचंद राठोड, गजानन नरवाडे, संतोष थोरवे, विश्वनाथ सांगळे, मिठ्ठू फड यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी शिवसेनेत आले आहेत. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे बुलढाणा जिह्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढली असून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.