दरोडेखोरांना आठ तासात पकडले

67

ठाणे: ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरात ४ जानेवारीला ओला कॅब चालकाला लुटल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या ८ तासांत दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे. या दरोडेखोरांकडून १५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

जोगेश्वरी येथे राहणाऱ्या राधेकृष्ण यादव या ४४ वर्षीय ओला कॅब वाहनाच्या चालकाने बुधवारी सकाळी साडे आठच्या सुमारास ठाणे पूर्वेला कोपरी परिसरात गाडी उभी केली होती. यावेळी गाडीबाहेर प्रवाशाची वाट पाहत असताना पाच अनोळखी इसमांनी त्यांना मारहाण करून धमकावत यादव यांच्याकडील पाकीट, तीन मोबाईल तसेच गाडीतील श्रीकृष्णाची काढून पोबारा केला. कोपरी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद होताच पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने हाती घेतलेल्या शोधकार्यात व्हॅली रॉड्रीक्स, अजय डिसोजा, चंद्रकांत शिंदे, अमन ढेंडवाळ, मनोज गोहील या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरून नेलेले पाकीट, ३ मोबाईल आणि श्रीकृष्णची मुर्ती असा ऐवज हस्तगत करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या