सोन्याची बिस्कीटं अन् असंख्य नाणी; घरासमोर स्विमिंग पूल खोदताना सापडला गुप्त खजिना

कधी कोणाच नशीब फळफळले काही सांगिता येत नाही. घराच्या अडगळीच्या खोलीत जमिनीखाली सोने चांदी सापडली तर, किंवा अचानक करोडो रुपयांची लॉटरी लागली तर… असे स्वप्न प्रत्येकाने पाहिली असतील. अशीच एक घटना फ्रान्समध्ये घडली. येथे एका व्यक्तीच्या घराच्या बागेत जमीनीखाली चक्क सात कोटी रुपये किंमतीचा सोन्याचा गुप्त खजिना सापडला आहे.

सदर घटना ही ल्योनजवळच्या न्यूविले-सुर-साओन शहरात घडली. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या घराच्या बागेत स्विमिंग पूल बांधण्यासाठी खोदकान सुरू केले होते. यावेळी त्याला एक पिशवी सापडली. या पिशवीत सोन्याची पाच मोठी बिस्किटे आणि असंख्य सोन्याची नाणी भरलेली होती. दरम्यान घरच्या मालकाने क्षणाचाही विलंब न करता या खजिन्याची सगळी माहिती स्थानिक सांस्कृतिक विभाग आणि प्रशासनाला दिली.

प्रशासनाला माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन खजिन्याची कसून तपासणी केली. यावेळी या खजिना पुरातन काळातील नसल्याचे अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान स्पष्ट केले. त्यामुळे हा संपूर्ण खजिना आता घरमालकाच्या हातात सोपवण्यात आला आहे.