
सध्या शेअर बाजारात गुंतवणूकदारांना आयपीओ चांगला नफा मिळवून देत आहेत. आता नुकत्याच आलेल्या बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. तसेच या आयपीओने लिस्टिंगच्यावेळीच गुंतवणूकदारांना तब्बल दुप्पट नफा मिळवून दिला आहे. या आयपीओची इश्यूप्राइस 70 रुपये होती. लिस्टिंगच्या वेळी याची किंमत 150 वर गेली. तसेच लिस्टिंगनंतर यात दमदरा तेजी दिसत आहे. त्यामुळे हा शेअर विक्रम करण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. हा शेअर 800 रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
बजाज हाउसिंग या शेअरची लिस्टिंग सोमवारी 16 सप्टेंबर रोजी झाली. तेव्हा 150 रुपयांना लिस्टिंग झालेल्या या शेअरमध्ये तेजी दिसत असून आता हा शेअर 180 रुपयांपर्यंत गेला आहे. या तेजीमुळे या शेअरला अप्पर सर्किच लागत आहे. आता हा शेअर मल्टीबॅगर ठरत गुंतवणूकदरांना जबरदस्त परतावा देईल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
लिस्टिंग झाल्यानंतर सोमवारी शेअरमध्ये तेजी होती. तसेच मंगळवारी हा शेअर 180 रुपयांपर्यंत पोहचला होता. आता हा शेअर 165 ते 175 या किंमतीत मिळत असल्यास तो घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच दीर्घकाळसाठी हा शेअर घेणाऱ्यांना जबरदस्त परतावा मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकालावधीत हा शेअर 800 रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.