
भायखळा येथील अत्याधुनिक केबल-स्टेड पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून हा पूल पावसाळय़ापूर्वी वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (महारेल) जाहीर केले आहे. नव्या पुलामुळे वाहनचालकांना दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- एकूण लांबी – 916 मीटर
- पुलाची उंची – 9.70 मीटर
- पायलॉन उंची – 50 मीटर
- मार्गिका – 4 मार्गिका (दोन मार्गिकांचा विस्तार)



























































