
कॅनडामध्ये राहणाऱया एका हिंदुस्थानी तरुणाला महिला डॉक्टरांसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. वैभव असे या तरुणाचे नाव आहे. त्याला पॅनडाचे नागरिकत्व मिळाले आहे. वैभव आधी क्लिनिकची रेकी करायचा. त्यानंतर महिला डॉक्टर असल्यास तेथे तो रुग्ण बनून जायचा. आजारी असल्याचे नाटक करायचा आणि तपासणीच्या बहाण्याने महिला डॉक्टरशी अश्लील चाळे करायचा. वैभवचा हा प्रकार वाढल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर चार गंभीर आरोप लावले आहेत. हे प्रकरण न्यायालयात असल्याने आरोपीचा हिंदुस्थानी पत्ता आणि डॉक्टरांची नावे सार्वजनिक केली जाऊ शकत नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.

























































