
वाळवीमुळे घराच्या भिंतींचे किंवा लाकडी फर्निचरचे नुकसान होते. असे होऊ नये म्हणून काही उपाययोजना करता येतात. मीठ हे वाळवी नष्ट करण्यासाठी घरात सहज उपलब्ध असलेला उपाय आहे. एका ग्लास कोमट पाण्यात भरपूर मीठ घालून ते पाणी भिंतीतील भेगा, कोपरे आणि जिथून वाळवी येते त्या जागी सोडा. कडुलिंबाचं तेल वाळवीसाठी खूपच उपयुक्त आहे.
बोरिक पावडर वाळवी नष्ट करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते. बोरिक पावडर ही विषारी असल्यामुळे लहान मुलं आणि पाळीव प्राणी यांच्यापासून ती नक्कीच दूर ठेवा. व्हिनेगर आणि लिंबाचा रस हे दोन्ही नैसर्गिकरीत्या कीटकांना दूर ठेवतात. त्यांचा वापर करता येईल.
































































