262 एकरचे भूखंड हडपले; शाह, ठक्कर, मनवानी यांच्यासह 194 जणांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भूमी अभिलेख कार्यालयाचे बनावट सही, शिक्के वापरून गरीबांच्या घरांसाठी राखीव असलेले 262 एकरचे भूखंड हडपल्याप्रकरणी अखेर पोलिसांनी बड्या बिल्डरांसह 194 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक ठक्कर, राजेंद्र शाह, विनोद मनवानी, गणेश गीते यांचाही यात समावेश आहे.

एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्राच्या लेआऊटमध्ये, निवासी वापराच्या प्रकल्पामध्ये वीस टक्के भूखंड व घरे गरीबांसाठी राखीव ठेवण्याची म्हाडाची योजना आहे. हे वीस टक्के क्षेत्र हडपण्यासाठी नाशिकमधील बिल्डर व विकासकांनी भूमी अभिलेखचे बनावट सही, शिक्के वापरून 262 एकर क्षेत्र हडपले आहे. याप्रकरणी नाशिक शहरातील संबंधित सर्वे नंबरप्रमाणे 49 प्रकरणांमध्ये सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर महापालिका, महसूल आणि भूमी अभिलेखची यंत्रणा खडबडून जागी झाली.

नाशिक शहरातील अनेक भूखंड घोटाळ्यात सहभागी असलेले अभिषेक ठक्कर, सोनु मनवानीचा भाऊ विनोद मनवानी, गणेश गीते, महेश मालु, पुरव दिलीप पंजवाणी, भावेश शाह, धमेंद्र शाह, जयंतीलाल शाह, राजेंद्र शाह, विशाल शहा, शमा मणियार, अशोक बागमार, अजय भंडारी, शपुंतला धाडीवाल, अश्विनी जैन, संगीता भंडारी, कर्सन पटेल, दिनेश अग्रवाल, मुकेश जैन, अनिल भंडारी, ललित साखला, विद्या ललित साखला, हिना साखला, गरीमा साखला, अंजन भालोडिया, संजय जैन, अभय अंबालाल नहार, शिवांग बिपीन बटाविया, दिपक भगवानदास करमचंदानी, अशोक पी. बागमार, श्रेयस ललित साखला, जगदीश जशभाई पटेल, प्रशांत एच. राठोड, अनिल लालचंद कालरा, चोरडीया, सुराणा, भंडारी, मुनोत, राहुल जयप्रकाश लुनावत, अमिर दिनेश कुवर यांचाही यात समावेश आहे. आता हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक व आयकर विभागाकडे जावू नये यासाठी त्याच्यासह सर्व संबंधितांची धडपड सुरू आहे.