
अभिनेता रणवीर सिंह याच्याविरोधात बंगळुरूच्या हाय ग्राऊंड्स पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीरने हिंदू धार्मिक भावनांचा आणि कर्नाटकच्या चावुंडी दैव परंपरेचा अपमान केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 नोव्हेंबर रोजी गोव्यात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाशी संबंधित एका कार्यक्रमात रणवीरने स्टेजवर आक्षेपार्ह टिप्पणी करत देवाची खिल्ली उडवणारे हावभाव केले होते.





























































