संतोष बांगरवर गुन्हा दाखल

हिंगोली जिह्यातील कळमनुरी विधानसभेत मिंधे गटाचे उमेदवार संतोष बांगर यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदारांना पैसे वाटप करणे आणि सावरखेडा शिवारात परवानगी न घेता मंडप उभारणी करून कार्यक्रमाच्या नावाखाली पैसे वाटप केल्याचा आरोप आहे. महिलांना एकत्र करून पैसे वाटप केले जात असल्याची तक्रार मिळाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.