मोदी सरकारची जातनिहाय जनगणना ही बहुजनांचा विश्वासघात आहे, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जातनिहाय जनगणनेबाबत संसदेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरानंतर त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी जातनिहाय जनगणनेला विश्वासघात म्हटले. ते म्हणाले आहेत की, सरकारची जातनिहाय जनगणना देशातील बहुजनांचा विश्वासघात आहे.

केंद्र सरकारकडून मिळालेल्या उत्तराची परत X वर शेअर करत राहुल गांधी म्हणाले आहेत की, “मी संसदेत जातनिहाय जनगणनेसंदर्भात सरकारला प्रश्न विचारला असता त्यावर सरकारचं उत्तर धक्कादायक होतं. कोणतात ठोस आराखडा नाही, ना ना वेळेचं बंधन, ना संसदेत चर्चा, ना जनतेशी संवाद.”

ते म्हणाले, “इतर राज्यांनी केलेल्या यशस्वी जातनिहाय जनगणनेच्या धोरणांमधून शिकण्याची केंद्र सरकारची कोणतीही तयारी नाही. त्यामुळे मोदी सरकारची ही जातनिहाय जनगणना देशातील बहुजनांचा विश्वासघात आहे.”