
कॅट अर्थात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणाने बंगळुरु चेंगराचेंगरीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जबाबदार आहे, असे म्हटले आहे. बंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी निलंबित वरिष्ठ आयपीएस अधिकारी विकास कुमार पुन्हा सेवेत रुजू झाल्याचे वृत्त आहे. त्यांनी निलंबनाला आव्हान दिले होते. यानंतर ‘कॅट’ने सरकारला नोटीस बजावली आणि राज्य सरकारकडून उत्तर मागवले. त्यानंतर न्यायाधीकरणाने विकास यांचे निलंबन रद्द केले.