
अमेरिकेतील इडाहो राज्यातील ‘ओल्ड स्टेट सॅलून’ नावाच्या प्रसिद्ध बारने एक विचित्र ऑफर दिली आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडून द्या, वाट्टेल तेवढी फ्री बीअर मिळवा, अशी ही ऑफर आहे.
बारने एक्सवर पोस्ट करत म्हटलेय, ‘जर कोणत्याही व्यक्तीने अमेरिकन इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्पर्ह्समेंटला मदत करून इडाहोमध्ये असलेल्या कोणत्याही बेकायदेशीर स्थलांतरिताची (इमिग्रंट) ओळख पटवून दिली आणि त्याला अमेरिकेतून हद्दपार करण्यात यशस्वी ठरले, तर त्याला संपूर्ण एक महिना बारमध्ये अमर्यादित मोफत बीअर मिळेल.’ अनेक युजर्सनी याला खेळासारखे म्हटले, तर काहींनी विजेते घोषित करण्याचा सल्ला दिला. काही युजर्सनी तर आयुष्यभर मोफत बीअर देण्याची मागणी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इमिग्रेशन धोरण आणखी कठोर केले आहे. त्यांनी नुकतेच ‘थर्ड वर्ल्ड पंट्रीज’मधून येणाऱ्या निर्वासितांना कायमस्वरूपी थांबवण्याची घोषणा केली होती. हा बार यापूर्वीही वादात राहिला आहे. कारण याच बारने गेल्या वर्षी जून महिन्याला ‘हेट्रोसेक्शुअल अवेअरनेस मंथ’ (विषमलिंगी जागरूकता महिना) घोषित केले होते. बारने सांगितले होते की, या महिन्यात फक्त विषमलिंगी लोकांनाच विशेष ऑफर किंवा सवलत मिळेल. त्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता.



























































