
हरयाणातील आयडीएफसी बँकेत 590 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची आता सीबीआयमार्कत चौकशी केली जाणार आहे. हरयाणा सरकारने यासाठी पेंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. हरयाणा सरकारच्या खात्यात पूर्ण 590 कोटी रुपये परत आले असले तरी, मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे. आतापर्यंत या प्रकरणाची चौकशी अॅण्टी करप्शन ब्युरो (एसीबी) करत आहे, तर अनेक आयएएस अधिकाऱयांची भूमिका संशयाच्या भोवऱयात आहे.



























































