धनुष-कृतीच्या ‘तेरे इश्क में’ चित्रपटाला सेन्साॅर बोर्डाचा हिरवा कंदील

आनंद एल. राय यांचा नवीन चित्रपट, “तेरे इश्क में” चित्रपटाला सेन्सार बोर्डाकडून परवानगी मिळाली. धनुष आणि कृती सेनन अभिनीत या चित्रपटाने आधीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी कमाई केल्याची चर्चा आहे. दरम्यान, आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रदर्शनाच्या फक्त दोन दिवस आधी, केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाने (CBFC) मंगळवारी या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले.

दिग्दर्शकाच्या इच्छेनुसार रोमँटिक आणि अॅक्शन दृश्ये यांना अखेर परवानगी देण्यात आली. फक्त या चित्रपटातील एका शब्दावर मात्र कात्री लावण्यात आली आहे. “तेरे इश्क में” च्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाली आहे.

देशातील प्रमुख मल्टिप्लेक्समधील या चित्रपटाचे शो शुक्रवार, शनिवार आणि रविवारी आधीच हाऊसफुल होते. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्याक्षणी या ट्रेलरने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. शंकर (धनुष) आणि मुक्ती (कृती सॅनन) यांच्या प्रेमकथेला एक भावनिक स्पर्श देण्यात दिग्दर्शक यशस्वी झाल्याचे दिसते. ट्रेलरमध्ये प्रेम आणि इतर भावभावनांचा उत्तम संगम पाहायला मिळत आहे. ‘रांझना’नंतर आनंद एल राय आणि धनुष पुन्हा एकत्र आले आहेत.

2016 मध्ये आलेल्या “रांझणा” नंतर आनंद एल. राय आणि धनुष यांचा हा दुसरा चित्रपट आहे. हिमांशू शर्मा आणि नीरज यादव यांनी चित्रपटाची पटकथा लिहीली असून, संगीत ए.आर. रहमान यांचे आहे. तसेच गीते इर्शाद कामिल यांची आहेत. तेरे इश्क में येत्या 28 नोव्हेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत एकाच वेळी प्रदर्शित होईल. विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, हा चित्रपट त्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी 40 ते 50 कोटी रुपयांची कमाई करू शकेल.