अश्लील कंटेट भोवले; 25 अ‍ॅप्सवर बंदी

अश्लील कंटेट दाखवणाऱ्या अ‍ॅप्सविरोधात केंद्र सरकारने कडक पावले उचलली आहेत. बोल्ड कंटेट पुरवणाऱ्या 25 अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. ज्या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे, त्यामध्ये उल्लू, अल्ट बालाजी, देसी फ्लिक्स, बिग शॉट्स या प्रमुख अ‍ॅप्सचा समावेश आहे. सरकारने हा निर्णय अश्लील आणि लैंगिक स्वरूपाच्या कंटेंटविरोधात आखण्यात आलेल्या धोरणांतर्गत घेतला आहे. हे अ‍ॅप्स 18 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी असलेले ओटीटी चॅनेल्स, आयटी नियम 2021 आणि कलम 292-293 चे उल्लंघन करत होते.

आयटी कायद्याच्या कलम 67 आणि 67 अ अंतर्गत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील किंवा लैंगिक स्वरूपाच्या कंटेंटच्या प्रसारणावर व प्रकाशनावर बंदी आहे. त्याशिवाय आयपीसीच्या कलम 292 आणि 293 अंतर्गत अश्लील साहित्य व कंटेंटचे वितरण, सार्वजनिक प्रदर्शन यावर दंडात्मक तरतुदी आहेत. या ओटीटी प्लॅटफॉर्म्सना स्व नियमनाचा अधिकारी दिला होता, परंतु त्यांनी त्याचा गैरवापर केला. उल्लू, अल्ट बालाजी, देसिफ्लिक्स, बिग शॉट्स, बूमेक्स, मूडएक्स, निओनएक्स व्हीआयपी, मोज फ्लिक्स, ट्रिप्लेक्स, हलचल अ‍ॅप्स, हॉट एक्स व्हीआयपी, अनकट अड्डा, बेशरम्स, एक्स्ट्रा मूड, चिकूफिक्स, फुगी, प्राईम प्ले, हंटर्स, रॅबिट मूव्हीज, वूवी, एक्स प्राईम, येसमा, ड्रीम्स फिल्म्स, हॉट शॉट व्हीआयपी, या अ‍ॅप्सवर बंदी घातली.