
महिला क्रिकेटला प्रोत्साहन मिळावे म्हणून एकीकडे आयसीसीने सामन्यांची तिकीटे 100 रुपयांत उपलब्ध केली आहेत तर दुसरीकडे आयपीएलची मनोरंजक आतषबाजी क्रिकेटप्रेमींचा खिसा कापणारी ठरणार आहे.
केंद्र सरकारने आयपीएल तिकीटांचे जीएसटी 28 टक्क्यांवरून थेट 40 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. त्यामुळे 1000 रुपयांचे तिकीट आता 1280 रुपयांऐवजी 1400 रुपये इतकी महागडी ठरतील. या वाढीसह आयपीएल तिकिटे आता देशातील सर्वात उच्च जीएसटी वर्गवारीत मोडली जाणार आहेत.