
केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आठव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. कामगार संघटनांनी महागाई भत्त्यात म्हणजे डीएच्या गणना पद्धतीत बदल करण्याची मागणी केली आहे. या बदलाबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. वाढ करण्याची मागणी केली आहे. आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू मानला जात असून वेतनवाढीचा अंतिम निर्णय 2026 च्या अखेरीस किंवा 2027 पर्यंत होण्याची शक्यता आहे.
निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आठव्या वेतन आयोगाची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सध्या कर्मचारी संघटना आणि इतर संबंधितांकडून सूचना व शिफारशी घेत आहे. विविध संस्था 30 मार्च 2026 पर्यंत आपल्या सूचना सादर करू शकतात. या शिफारशींनंतरच वेतनवाढ आणि पेन्शनवाढ किती होणार हे निश्चित होईल.
सरकार सहसा होळी आणि दिवाळी या सणांच्या आसपास महागाई भत्त्याची घोषणा करते. त्यामुळे महागाई भत्त्यातील वाढीबाबतची घोषणा आता मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात होण्याची अपेक्षा आहे. महागाई भत्त्यातील वाढीचे लाभ 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होतील. याचा अर्थ असा की, कर्मचाऱयांना ‘थकबाकी’ म्हणजेच मागील महिन्यांच्या वेतनातील फरक एकदाच मिळेल.
8 व्या वेतन आयोगासाठी कर्मचारी संघटना 3.0 ते 4.35 फिटमेंट फॅक्टरची मागणी करत आहेत. महागाई आणि वाढलेला जीवनावश्यक खर्च लक्षात घेता हा फॅक्टर वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. फिटमेंट फॅक्टर जास्त असल्यास बेसिक सॅलरी, पेन्शन आणि एकूण उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते.
जर केंद्र सरकारने कामगारांच्या मागण्या आणि वेतन निश्चितीचे नवे त्रू लागू केले तर कर्मचाऱयांच्या फायदा होईल. लेव्हल 1 कर्मचारी – सध्याचा बेसिक पगार 18,000 रुपये हा वाढून अंदाजे 36,000 ते 46,260 रुपये होईल.


























































