
गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने अखेर रविवारचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे उद्या रविवारी बाप्पाच्या दर्शनासाठी लालबाग-परळला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गणेशोत्सवात लालबाग-परळमधील गणपती पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. मात्र मध्य रेल्वेने रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या कालावधीत मेगाब्लॉकचे नियोजन केले होते. या कालावधीत चिंचपोकळी, करी रोड, सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद बंदर या स्थानकांवरील लोकलचा थांबा रद्द करण्यात येणार होता. त्यामुळे दर्शनासाठी लालबाग-परळला जाणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय झाली असती. त्यामुळे हा मेगाब्लॉक रद्द करण्यात यावा, अशी मागणी रेल्वे प्रवाशी संघटनांकडून जोर धरू लागली होती.