मध्य रेल्वे उशिराने, स्टेशन्सवर प्रवाशांची गर्दी

मुंबईची लाइफ लाइन मध्य रेल्वेची वाहतूक काही वेळापासून उशिराने सुरू आहे. यामुळे कामावरून घरी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांची विविध रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाली आहे. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे. यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

दरम्यान, मुंबईत मंगळवारपासून अवकाळी पावसाचे वातावरण आहे. बुधवारी पुन्हा एकदा वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडणार अशी शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा फटका देखील मुंबईचा वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे.