जाहिरातबाजीतून मध्य रेल्वेची 8 कोटींची कमाई

मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाडय़ांवर आतील आणि बाहेरील भागात जाहिरात करून 8.38 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतीय रेल्वेत महसूल वाढविण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम आणली आहे. यामार्फत महसूल वाढविण्यासाठी अनेक योजना राबवणे सुरू आहे. रेल्वे गाडय़ा, स्थानके तसेच इतर ठिकाणी जाहिरातींसाठी जागा भाडय़ाने देणे यांसारख्या भाडेतत्त्वावरील उपक्रमांमधून महसूल मिळविला जात आहे. मध्य रेल्वेने वर्षभरात रेल्वेगाडय़ांच्या आतील व बाहेरील बाजूस जाहिरात करण्यास विविध पंपन्यांना परवानगी देऊन 8.38 कोटींचा महसूल गोळा केला आहे.