
मध्य रेल्वेने देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी पाच तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या अवधीत धिम्या मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहारपर्यंत सर्व लोकल वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. ज्या रेल्वे स्थानकांमध्ये नियमित जलद गाडय़ांचा थांबा नाही, अशा स्थानकांतील प्रवाशांची ब्लॉक काळात गैरसोय होणार आहे. रविवारी सीएसएमटीहून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45पर्यंत सुटणाऱया डाऊन धिम्या मार्गावरील लोकल ट्रेन विद्याविहारपर्यंत केवळ भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबणार आहेत. पुढे विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवल्या जातील.























































