
सांगली जिह्यातील इस्लामपूर शहराचे नामकरण आता ईश्वरपूर करण्यात आले. या शहराच्या नामकरणाला केंद्र सरकारने आता मंजुरी दिली आहे. 39 वर्षांपूर्वी हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम ईश्वरपूर असा जाहीर उल्लेख केला होता.
इस्लामपूर या शहराचे नाव ईश्वरपूर असे करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. विधिमंडळाच्या अधिवेशनात यासंदर्भातील प्रस्तावही मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर या नावाचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला होता. या प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिली.






























































