
चंदीगडमधील एका उच्च सुरक्षा असलेल्या भागात आज दुपारी एक ड्रोन पंजाब आणि हरीयाणा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या निवासस्थानी पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
चंदीगडमधील सेक्टर 10 मध्ये न्यायमूर्तींचे हे निवासस्थान आहे. अतिसंवेदनशील असलेल्या भागात हा ड्रोन पडल्याने सुरक्षा व्यवस्थांची तारांबळ उडाली. घटनेनंतर या परिसरात चंदीगड पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली असून खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी बाँबशोधक व बाँबनाशक पथकाला पाचारण करण्यात आले.

























































