
मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृहखात्यावर डोळा आहे. चंद्रकांतदादा यांनी स्वतःच तासगावमधील एका कार्यक्रमात गृहमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. मी राज्यातील सीनियर मंत्री आहे. जवळपास सर्व मंत्रिपदे मी भूषवली आहेत. ‘गृहमंत्री’पद फक्त राहिले आहे, असे सांगत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवली.