
>> चंद्रसेन टिळेकर
मुलगाच हवा हा समाजातील हट्ट आजही कमी झालेला नाही. या ढोंगी समाजातील ‘आपला वारसाहक्क पुत्रच चालवू शकतो’ हा समज पुढे जात पुत्राशिवाय स्वर्गात प्रवेश नाही इथपर्यंत जाणारा. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील या ठाण मांडून बसलेल्या अंधश्रद्धा आपणच रोखल्या पाहिजेत.
गेल्या आठवडय़ात ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम पाहत बसलो होतो. फास्टेस्ट फिंगर्स फर्स्टमध्ये पहिली आलेली मुलगी अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसली होती. नेहमीप्रमाणे अमिताभ यांनी तिला तिची माहिती विचारली. त्या मुलीने जी आपली माहिती दिली त्यावरून तर मी अवाकच झालो. सगळ्या प्रेक्षक वर्गात सन्नाटा पसरला, एवढेच काय, पण अमिताभ बच्चन हेही सर्द झाल्यासारखे दिसले.
त्या मुलीने जी माहिती सांगितली ती अशी, तिच्या आईला तिच्यासह आणखीन दोन मुली म्हणजे एकूण तीन मुलीच झाल्या होत्या. आपल्या पत्नीने केवळ मुलींना जन्म दिला म्हणून एके दिवशी तिच्या जनकाचे पित्त खवळले आणि त्याने त्या तीन मुलींसह आपल्या पत्नीला घराबाहेर काढले. “तुम मुझे क्या नरक में भेजना चाहती हो ?’’ असे संतापाने तो आपल्या पत्नीला विचारत होता. त्या बिचारीने गयावया करीत आपल्या पतीचे पाय धरले, पण त्याला काही दया आली नाही. आपल्याला मुलगा नसल्यामुळे आपण मृत्यूनंतर स्वर्गाऐवजी नरकात जाऊ यावर त्याची दृढ श्रद्धा असावी. शेवटी ती बिचारी बाई आपल्या तीन मुलींसह नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडली. त्या वेळी या मुलीचे वय होते आठ वर्षे, तर दोन लहान बहिणींची वये होती केवळ चार आणि सहा वर्षे.
जवळचे कुणीच नातेवाईक नसल्यामुळे त्या तीन मुलींना आपल्या आईसह चक्क भीक मागावी लागली. धर्मशाळा तरी त्यांना किती दिवस ठेवून घेणार? शेवटी सगळी कामे करण्याच्या बोलीवर त्या तीन बहिणी आपल्या आईसह एका आश्रमाच्या आश्रयाला राहिल्या. मुळातच त्या तिन्ही मुली हुशार असल्याने त्यांनी उत्तम शिक्षण घेतले आणि आज त्या तीन बहिणीतली सगळ्यात मोठी बहीण अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसली होती.
लहानपणी सुट्टीत मी माझ्या देहू गावी गेलो की, तिथे अशा काही कथा मला ऐकायला मिळायच्या. पत्नीला केवळ मुलीच झाल्याने तिला सोडचिठ्ठी देऊन दुसरा विवाह केल्याच्या. अर्थात त्यातले काही पतीदेव उदार होऊन आपल्या प्रथम पत्नीला घराबाहेर न काढता द्वितीय पत्नीबरोबर राहण्याची परवानगीही देत. ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.
एखाद्या स्त्राrला मुलीच झाल्या तर तो दोष त्या स्त्राrचाच असला पाहिजे असे मलाही त्या वेळी वाटायचे. कारण हे होते की, स्त्राrच जर अपत्यांना जन्म देते, तर मुलगा किंवा मुलगी जन्माला घालायची जबाबदारी तिचीच असली पाहिजे. मी तेव्हा जेमतेम 10-12 वर्षांचा होतो. मातापित्यांच्या शरीरात गुणसूत्र (cromosome) नावाचे काही असते आणि ते मुलगा होणार की मुलगी हे ठरवते याबाबतीत मी पूर्णपणे अज्ञानी असणे स्वाभाविकच होते. परंतु पुढे विज्ञान शाखेत शिक्षण घेताना हे रहस्य उलगडले. ही गुणसूत्रे दोन प्रकारची असतात, एकाला X म्हणतात, तर दुसऱयाला Y म्हणतात हेही समजले. त्याच्याही पुढे जाऊन मातेच्या देहात फक्त X प्रकारचे गुणसूत्र असते, तर पित्याच्या शरीरात X आणि Y अशी दोन्ही प्रकारची गुणसूत्रे असतात याचे ज्ञान झाले. पण खरे ज्ञान व्हायचे ते अजून बाकी होते ते म्हणजे स्त्राr-पुरुष मिलनप्रसंगी स्त्राrचे X हे गुणसूत्र आणि पुरुषाचेही X हेच गुणसूत्र एकत्र आले तर मुलगी होते, पण जर का स्त्राrच्या ठायी एकमेव असलेले X प्रकारचे गुणसूत्र व पुरुषाच्या अंगी असलेले Y हे गुणसूत्र एकत्र आले तर मात्र मुलगा जन्माला येतो. म्हणजेच पुत्रप्राप्ती होते.
हे जे मला ज्ञान प्राप्त झाले ते माध्यमिक शिक्षण घेत असताना म्हणजे तब्बल साठ वर्षांपूर्वी. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अर्थातच आता याबाबतीत आपला समाज सज्ञान झाला असला पाहिजे असे मी धरून चाललो होतो. पण त्या कार्यक्रमातील त्या मुलीची कहाणी ऐकून अजूनही अनेक बाबतीत आपला समाज मध्ययुगात तर वावरत नाही ना अशी भीती वाटली. ही मुलगी उत्तर हिंदुस्थानातून आली होती. तिथे अजून अंधश्रद्धेचा अंधकार मोठय़ा प्रमाणावर आहे हे मान्यच करावे लागते.
आपल्या महाराष्ट्रापुरते बोलायचे तर या आणि अशा असंख्य अंधश्रद्धांविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्पृहणीय कार्य करते आहे. परंतु शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रातही भरपूर अंधश्रद्धा ठाण मांडून बसल्या आहेत आणि रोज नव्याने निर्माण होत आहेत. तेव्हा अं.नि.स.सारख्या संस्था प्रत्येक गावात स्थापन झाल्या पाहिजेत यात काही शंका नाही. असो.
मला प्रश्न पडला की, मुलगा नसल्यामुळे पुरुष एकटाच नरकात का जातो? स्त्राrही नरकात जायला पाहिजे. कारण ती अपत्यांना जन्माला घालते. मग थोडेफार वाचन केल्यावर लक्षात आले की, इतर अंधश्रद्धा समाजात पसरविण्याचे पुण्यकृत्य (?) जसे आमच्या ज्योतिषी बंधूंनी केले आहे तसे अंधश्रद्धा पसरविण्याचे श्रेयही त्यांनाच द्यायला हवे. त्यांच्या तत्त्वानुसार ‘पू’ नावाचा नरक असतो आणि त्यापासून सुटका करून घ्यायची असेल, तर पुत्राने पुढाकार घेणे आवश्यक असते. इतकेच काय पण परलोकी गेलेल्या पूर्वजांना सुखशांती मिळवून द्यायची असेल तर पुत्राने तर्पण विधी नावाचा विधी करणे आवश्यक आहे. हा उपदेश मुंबईतील एका प्रसिद्ध ज्योतिषाच्या फेसबुकवर आजही आपल्याला वाचायला मिळेल.
मुलगाच हवा या हट्टापायी स्त्राrला अनेक बाळंतपणातून जावे लागते आणि त्यापायी तिचा मृत्यूही ओढवतो हेही एक कटू सत्य आहे. त्याचबरोबर देशपातळीवर लोकसंख्या वाढते याबद्दलही कोणाच्या मनात शंका नसावी.
आपल्या समाजात आणखी असाही समज आहे की, ज्या स्त्राrला फक्त मुलीच झालेल्या असतात तिच्या मुलींनाही लग्नानंतर मुलीच होतात. तेव्हा एक सावधगिरी म्हणून अशा स्त्राrच्या मुलीशी मुळीच विवाह करू नये. हुंडय़ाअभावी जशा उपवर मुली रखडतात तसेच हेही कारण मुलींचे लग्न जमण्यात विघ्न आणते. तूर्तास आपण स्वर्ग, नरक, मोक्ष या कवी कल्पना आहेत एवढे जरी मान्य केले तरी वरील अंधश्रद्धांना आळा बसेल यात काही शंका नाही.