राज्यात 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली

शासकीय कार्यालयांतील कामकाजाचा वाढत जाणारा व्याप आणि नागरी क्षेत्रातील वाढलेली लोकसंख्या पाहता जिह्यातील दूरच्या भागातील जनतेस तातडीने व नजीकच्या ठिकाणी सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत जिल्हा कार्यालयातील कामकाजाचा व्याप आदींचा आढावा घेऊन  राज्यात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

ही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.