धक्कादायक! AI मुळे माय-लेकाचा अंत? OpenAI विरोधात खटला दाखल!

एआयमुळे मानवी जीवन धोक्यात आल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या आहेत. आता पुन्हा एका घटनेत चॅटजीपीटीला जबाबदार धरवल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ऑगस्ट 2025 मध्ये ग्रीनविच येथे एका 56 वर्षीय स्टीन एरिक सोएलबर्ग याने आपल्या 83 वर्षीय वृद्ध आईची सुझान एबर्सन अॅडम्स यांची हत्या केली. यानंतर स्वत: जीवन संपवले. आणि आता या संपूर्ण प्रकरणात OpenAI चॅटबॉट ChatGPT ला जबाबदार धरले आहे. स्वत: एलॉन मस्क यांनी याबाबत ट्वीट केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

द टाईम्सच्या वृत्तानुसार, कनेक्टिकटमधील रहिवासी सुझान एबर्सन अॅडम्स यांनी या प्रकरणाबाबत खटला दाखल केला होता. सोएलबर्ग (56) हे गेल्या काही महिन्यांपासून मानसिक आजाराने ग्रस्त होता. त्याला आई त्याला विष देऊन मारण्याचा किंवा त्याच्यावर हल्ला करण्याचा कट रचत आहे असे विचित्र भास व्हायचे. या भ्रमांचा सामना देण्याऐवजी चॅटजीपीटीने त्यांची भीती खरी असल्याचे भासवल्याचा गंभीर आरोप आहे. तो दररोज बराच वेळ चॅटजीपीटीशी बोलत असे. चॅटबॉटने त्याच्या शंका खऱ्या असल्यासारखे उत्तर दिले आणि त्याला अनेक गोष्टी खऱ्या वाटू लागल्या.यामुळे त्याची स्थिती आणखी बिकट झाली आणि या संपूर्ण प्रकऱणाला शेवटी हिंसक वळण लागले.

सोएलबर्ग यांच्या स्वभावात बदल होत गेले. हळूहळू त्यांनी एकटेच राहण पसंत केलं. कोणाशीही नीट बोलत नसल्याचे कुटुंबिय देखील चिंतेत होते. आणि अचानक एके दिवशी सोएलबर्ग याने आपल्या 83 वर्षीय वृद्ध आईची सुझान एबर्सन अॅडम्स यांची हत्या केली. यानंतर स्वत: जीवन संपवले. सोएलबर्ग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाला या प्रकरणाबाबत माहिती मिळाली. त्याला त्याच्या वडिलांचे चॅटजीपीटीशी केलेली संभाषणे सापडली. यातून सत्य बाहेर आहे.

दरम्यान या प्रकरणात एलॉन मस्क यांनी रोष व्यक्त केला आहे. X वर त्यांनी राक्षसी वृत्ती (Demonic) असा उल्लेख केला आहे. AI आता माणसांसारखे वागू लागले आहे. त्याने कोणत्याही भ्रमांना प्रोत्साहन देऊ नये, असे त्याने म्हणाले.