सारंगखेडा यात्रेत साडेचार कोटींची उलाढाल

सारंगखेडा येथील चेतक महोत्सवात यंदा तब्बल 756 अश्वांची विक्री झाली असून त्यातून थोडीथोडकी नव्हे तर चार कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाली आहे. सारंगखेडाच्या घोडेबाजारात या वर्षी सर्वाधिक घोडे दक्षिणेकडील व्यापाऱयांनी घेतले. 4 डिसेंबरपासून सुरू झालेली सारंगखेडा अश्वयात्रा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. देशात सर्वात मोठी घोडेबाजारांसाठी प्रसिद्ध अशी ही यात्रा आहे. या यात्रेत जातीवंत आणि उमदे घोडे विक्रीसाठी येत असतात, तर देशातील विविध राज्यांतून घोडे मालक आपले घोडे विक्रीसाठी आणि खरेदीसाठी इथे येतात. त्यामुळे सारंगखेडा यात्रा देशभरात प्रसिद्ध आहे.