
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत एपूण 11 लाख 17 हजार 477 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 859 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. उद्या मतदान पार पडल्यानंतर शुक्रवारी चार ठिकाणी मतमोजणी होईल.
महापालिकेसाठी मतदान शांततेत पार पडावे यासाठी शहरातील एपूण 1 हजार 267 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. एकूण 5 हजार 588 मतदान केंद्राध्यक्ष व पोलिंग अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱयांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. वेबकास्टिंग व निवडणूक निरीक्षण मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह राहावी यासाठी 537 मतदान केंद्रांवर मतदान कक्षाच्या आत व बाहेर वेबकास्टिंग पॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय, निवडणूक कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी 173 क्षेत्रीय अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्ट्राँग रूम व मतमोजणी पेंद्रे, मतदानानंतर ईव्हीएम यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी व मतमोजणीसाठी शहरात चार स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
कुठे होणार मतमोजणी
छत्रपती संभाजीनगरात आज मतदान पार पडल्यानंतर उद्या, शुक्रवारी शहरातील एपूण चार ठिकाणी मतमोजणी होणार आहे. यामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानपुरा, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय स्टेशन रोड. एस. एफ. एस. शाळा जालना रोड आणि गरवारे आयटी पार्प, चिकलठाणा एमआयडीसी या चार ठिकाणी ही मतमोजणी पार पडणार आहे.
3307 पोलीस आणि 1928 होमगार्ड तैनात
मतदान हे कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावे यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. शहरात एपूण 3 हजार 307 पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच त्यांच्या सोबतीला 1 हजार 928 होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारीही तैनात केले जाणार आहेत. शहरातील मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






























































