मतदारांना धमकी, शिंदे गटाचे आमदार सत्तार यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना न्यायालयाची नोटीस

2024 च्या सिल्लोड-सोयगाव विधानसभा निवडणुकीदरम्यान शिंदे गटातर्फे उमेदवार असलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी 18 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या प्रचाराच्या शेवटच्या जाहीर सभेत आपल्या भाषणामध्ये शेवटच्या चार मिनिट अगोदर तालुक्यातील मतदारांना उद्देशून दमबाजी केल्याप्रकरणी सिल्लोडचे मिंधे गटाचे आमदार अब्दुल सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

जे मतदार त्यांना मतदान करणार नाहीत त्यांची नावे गुप्तपणे चिठ्ठीद्वारे कळविण्याचे आवाहन करत अशा मतदारांवर ‘रामबाण उपाय’ करण्याची धमकी आमदार सत्तार यांनी जाहीर सभेत दिली होती. अशा मतदारांचा गोळ्या, इंजेक्शन, अँजिओग्राफी किंवा बायपास शस्त्रक्रियेने इंतजाम केला जाईल, असे सत्तार म्हणाले होते.