शोभिवंत फटाक्यांची बच्चे कंपनीत क्रेझ

दिवाळी म्हटलं की, फटाके हे आलेच. जादा आवाज आणि प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांपेक्षा शोभिवंत फटाक्यांची क्रेझ कायम आहे. बच्चे कंपनीची पसंती आपटी बारसारख्या असणाऱ्या पॉप अप फटाक्यांना आहे. यंदा मार्केटमध्ये हेलिकॉप्टर फटाका आला असून एका नगाची किंमत शंभर रुपये आहे. महागाईमुळे फटाक्यांच्या किमती 10 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दुकानदारांसह सर्वसामान्य ग्राहकांना याची झळ बसली आहे. जिथे हजार रुपयांच्या फटाक्यांची खरेदी व्हायची तिथे आता केवळ पाचशे रुपयांच्या फटाक्यांची ग्राहक खरेदी करत आहेत, असे दादरमधील एका विव्रेत्याने सांगितले.