चायनीज जे-35 ए स्टील्थ लढाऊ विमान खरेदीसाठी चीनची पाकिस्तानला 50 टक्के डिस्काऊंटची ऑफर

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्या लढाईत उघडपणे पाकिस्तानची बाजू घेणाऱया चीनने आपल्या मित्रांसाठी आता 50 टक्के डिस्काऊंटची ऑफर आणली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’वेळी हिंदुस्थानने पाकिस्तानच्या 12 हून जास्त एअरबेसना उद्ध्वस्त केले. यामुळे आता चीनने पाकिस्तानचे एअरफोर्स मजबूत करण्यासाठी चीनला जे-35ए स्टील्थ फायटर विमान 50 टक्के डिस्काऊंटसोबत देण्याची ऑफर देऊ केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन या वर्षी ऑगस्टमध्ये पाकिस्तानला जे-35ए स्टील्थ फायटर विमानाची पहिली खेप देऊ शकते. चीनने पाकिस्तानला या फायटर विमानाचा पुरवठा केल्यास हिंदुस्थानसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. कारण हिंदुस्थानकडे अद्याप कोणतेही स्टील्थ फायटर जेट नाही. हिंदुस्थानकडे अत्याधुनिक फायटर जेटमध्ये केवळ 36 राफेल आहे. हिंदुस्थानवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणाऱया चीनने नेहमीच पाकिस्तानची बाजू घेतली आहे. पाकिस्तानने चीनकडून 40 जे-35 स्टील्थ खरेदी करण्यासाठी करार केला आहे, परंतु हा करार किती रुपयांमध्ये करण्यात आला याची माहिती अद्याप समोर आली नाही.

– जे-35 लढाऊ विमानाला चीनमध्ये एफसी-31 किंवा शेन फेई असेही म्हटले जाते. हे चीनचे नेक्स्ट जनरेशन लढाऊ विमान आहे. या विमानाला अमेरिकेच्या स्टील्थ फायटर जेट एफ-35 ला टक्कर देण्यासाठी बनवण्यात आले आहे. या लढाऊ विमानाची क्षमता रडारला चकमा देण्याची आहे. यात विनाऑफ्टरबर्नर सुपरसोनिक स्पीड आहे.

– पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेऊन चीन हिंदुस्थानला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानच्या विरोधात लढण्यासाठी गुंतवून चीन हिंदुस्थानविरोधात कारवाया करण्यासाठी मोकळा राहतो. पाकिस्तानसारख्या देशाला जे-35ए देऊन याचा युद्धात कसा परफॉर्मन्स आहे, याची माहिती चीनला कळू शकेल. सध्या जगात केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या देशांकडे स्टील्थ फायटर जेट आहे. तुकाaसुद्धा कान नावाचे स्टील्थ जेट विमान बनवत आहे. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात आहे. त्याला मजबुती देण्यासाठी सबसिडीचा सौदा चीनने ठेवला आहे.