
चीनच्या दक्षिणेकडील युन्नान प्रांतात गुरुवारी सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात 11 रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. भूकंपाशी संबंधित उपकरणांची चाचणी करणारी एक चाचणी ट्रेन अचानक कर्मचाऱयांशी धडकल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर लगेचच रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन बचावकार्य सुरू केले होते. अपघाताच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे विभागाने दिले आहेत. पुनमिंग रेल्वे प्राधिकरणाने सोशल मीडियावर पोस्ट करून पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. 2011 मध्ये झालेल्या रेल्वे अपघातानंतरची ही दुसरी सर्वात मोठी रेल्वे दुर्घटना आहे.



























































