
बिहारच्या निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय वातावरण तापत आहे. आता बिहारमध्ये केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी भआजप-जदयूच्या अडचणी वाढवल्या आहेत. त्यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप-जदयूला धास्ती निर्माण झाली आहे. चिराग पासवान म्हणाले की, त्यांचा पक्ष बिहारमध्ये 143 विधानसभा जागा लढवेल. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीएचा भाग असलेल्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी केलेल्या या घोषमेमुळे भाजप आणि जेडीयूच्या अडचणी वाढणार आहेत.
चिराग पासवान यांनी रविवारी सांगितले की, ते बिहारच्या हितासाठी आगामी विधानसभा निवडणुका लढवू इच्छितात. त्यांचे विरोधक त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. चिराग यांनी रविवारी छपरा येथील राजेंद्र स्टेडियममध्ये आयोजित ‘नव संकल्प महासभे’ला संबोधित करताना एक मोठी घोषणा केली. चिराग पासवान म्हणाले की, त्यांचा पक्ष बिहारमधील 243 विधानसभा जागांवर निवडणूक लढवेल. या पवित्र भूमीवरून मी जाहीर करतो की मी निवडणूक लढवणार आहे. ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी, प्रत्येक बिहारी आणि प्रत्येक बिहारी कुटुंबासाठी महत्त्वाची आहे. आमचा पक्ष सर्व 243 जागांवर निवडणूक लढवेल. मी प्रत्येक जागेवर चिराग पासवान म्हणून निवडणूक लढवणार आहे.’
चिराग पासवान म्हणाले की, हत्या राजधानी पाटण्यात असो किंवा बिहारच्या दुर्गम गावात असो, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी सरकारला जबाबदार धरावे लागेल. चिराग म्हणाले की, सरकार जबाबदारीपासून पळून जाऊ शकत नाही. ही घटना शहरी भागात उघडपणे घडते. पोलिस स्टेशन शेजारी होते, अधिकारी त्याच परिसरात राहतात. जर अशा पॉश परिसरात अशी घटना घडली तर ती चिंतेची बाब आहे. सुशासनाच्या राजवटीत गुन्हेगारांना इतके बळ कुठून मिळाले हे आपण पाहिले पाहिजे. सरकारने गंभीर असले पाहिजे. बिहारमध्ये अधिवास धोरण लागू केले पाहिजे, मी त्याचे समर्थन करतो. तेजस्वी यादव यांचे नाव न घेता ते म्हणाले, ‘2023 मध्ये बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार सत्तेत असताना, राजदचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे शिक्षणमंत्री यांनी अधिवास धोरण रद्द केले,असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीदरम्यान आरक्षणाबाबत विरोधी पक्षांनी गोंधळ पसरवल्याचा आरोप त्यांनी केला. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना गोंधळात टाकण्यासाठी विरोधकांनी अनेक बनावट कथा चालवल्या आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान आरक्षणाच्या नावाखाली विरोधकांनीही गोंधळ पसरवला होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधी पक्ष पुन्हा गोंधळ पसरवतील. जोपर्यंत चिराग पासवान जिवंत आहेत तोपर्यंत आरक्षणाला किंवा संविधानाला कोणताही धोका नाही. मी चौकीदाराच्या भूमिकेत असताना याची खात्री करेन. मी समाजातील अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय, अति मागास आणि वंचित वर्गातील लोकांचा पालक आहे,असेही त्यांनी सांगितले.