
घणसोली येथे उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने धडक कारवाई केली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांवर सिडकोने वक्रदृष्टी वळवल्याने भूमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
घणसोली गावांमध्ये सर्व्हे क्रमांक 60, 122 आणि 61 वर शांताराम मढवी यांनी अनधिकृत बांधकाम केले होते. या बांधकामांवर सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. करावे गावातील सर्व्हे क्रमांक 214 वर अनधिकृत बांधकाम करण्यासाठी बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे साहित्य आणून ठेवण्यात आले होते. याची माहिती मिळाल्यानंतर सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने या ठिकाणी धाव घेऊन हे सर्व साहित्य ताब्यात घेतले. ही कारवाई मोठ्या पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. सिडकोप्रमाणेच नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू केली आहे.





























































