घाईने निष्कर्ष काढू नका ः नागरी उड्डाण मंत्रालय

अहमदाबाद विमान दुर्घटनेप्रकरणी परदेशी वृत्तपत्रांमधून अनेक निष्कर्ष काढण्यात येत आहेत. यावरून नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांनी संताप व्यक्त केला आहे. घाईघाईने कुठलाही निष्कर्ष काढू नका. संयम ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले.