ग्राहकांवरून दोन दुकानदारांमध्ये तुफान राडा; दगडफेक, लाठ्या-काठ्यांनी हल्ला; महिला गंभीर जखमी

ग्राहक मिळवण्यासाठी दोन लस्सी विक्रेत्या दुकानदारांमध्ये तुफान राडा पहायला मिळाला. ग्राहकांवरून दोघांमध्ये वाद झाला अन् पाहता पाहता वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही दुकानदारांनी एकमेकांवर दगडफेक, लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे ही घटना घडली आहे. लाडली मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर दोन लस्सी विक्रेत्यांमध्ये हा वाद झाला. ग्राहाकांना आपल्या बोलावण्यावरून दोन विक्रेत्यांमध्ये वाद झाला. यानंतर दोघांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठ्या-काठ्या आणि दगडाने मारहाण केली. यात अनेक जण जखमी झाले. एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ निदर्शनास आला असून याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पुढील कारवाई करू असे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास सुरू आहे.