
सध्या वायुप्रदूषण प्रचंड वाढले आहे. हवेतील धूळ, प्रदूषणाचे कण त्वचेवर चिकटतात. अशा वेळी चेहऱयाची त्वचा काळवंडते. तसेच चेहऱयावरील छिद्रे बंद होतात आणि मुरुम तसेच ब्लॅकहेड्सची समस्या वाढते.
यासाठी रात्री चेहरा धुतल्यानंतर एकदा वाफ घ्या. पाण्यात संत्र्याची साल तसेच बीटच्या पानांचे तुकडे टाका. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. बीटच्या पानांमुळे रक्ताभिसरण सुधारते.
संत्र्याची साल आणि बीटच्या पानांमुळे चेहऱयावरील बॅक्टेरियाची वाढ थांबते. अशा प्रकारची वाफ आठवडय़ातून तीन वेळा घ्यावी. जास्त वेळा घेतल्यास चेहऱयाचे नुकसान होऊ शकते.



























































